मी शरद पवार समर्थक नाही - पण या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे कि, महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांच्या शिवाय पानसुद्धा हलत नाही!!!
मी शाळेत असताना, काही शासकीय अधिकारी इन्सपेक्शन साठी आले होते. त्यांनी मला विचारलं कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले कि, "शरद पवार". अधिकारी गेल्यानंतर आमच्या मुख्याध्यापकांनी मला बोलावून घेतले व सांगितले कि, बाळ नुसत शरद पवार नाही तर, "श्री.शरदचंद्ररावजीपवारसाहेब" अस म्हणावं. हि माझी पवारांच्या दिग्गज व्यक्तिमत्वाशी झालेली पहिली ओळख होती…
- गेली अनेक वर्ष पवार साहेब नेहमीच चर्चेत राहिले, कधी वादग्रस्त विधाने, कधी राजकीय खेळ्या, कधी घेतलेले यु टर्न, तर कधी त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे…
न मागता सुधा बाहेरून भाजपला दिलेला पाठींबा हा मास्टरस्ट्रोकच म्हणावा लागेल. (भाजप हा पाठींबा घेईल किंवा नाही हा वेगळा प्रश्न आहे )
सर्वत्र भाजपचे (मोदींचे)वारे वाहत असताना बहुतेक त्यांना निवडणुकीच्या निकालांची कल्पना आली असावी आणि त्यांनी व त्यांच्या पक्षातल्या सर्वच नेत्यांनी अतिशय सावधपणे मोदींवर टीका केली. [एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी मोदींचा उल्लेख "श्री नरेंद्र मोदि साहेब" असा केला आणि मग टीका केली] खरोखर कौतुकास्पद आहे. हि राजकीय समज खूप कमी पक्षांमध्ये पहावयास मिळाली. बऱ्याच पक्षांसाठी हा एक धडा आहे, हातात सत्ता असल्याशिवाय नवीन नेते/नेतृत्व घडत नाहीत व सत्तेसाठी तसेच राज्याच्या हितासाठी स्वतःचा राग, अहंकार, विचारधारा सोडून आवश्यक ती तडजोड करण्याची तयारी सुधा तेवढीच महत्वाची आहे, हे सुधा दाखवून दिले.
एक उदाहरण देतो - मोदींनी बारामतीमध्ये जाऊन जहरी टीका केली, पण तरीही पवारांनी राजकीय समंजसपणा दाखवत त्या टीकेला संयमी उत्तर दिले, प्रचारादरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. आता निवडणूक संपल्यावर समजा राष्ट्रवादी + शिवसेना किंवा राष्ट्रवादी + भाजप अशी युती झाली तरीही पवारांना कोणी प्रश्न विचारणार नाही, पण या बाकी पक्षांना मात्र लोक नक्कीच प्रश्न विचारतील कि राष्ट्रवादी वर एवढी जहरी टीका करून सुधा परत त्यांच्याशी हातमिळवणी कशी करता?
आता आपण ठरवायचे आहे कि या देशातील सर्वांत हुशार राजकारणी कोण? नरेंद्र मोदी नक्कीच नाहीत!!!

No comments:
Post a Comment