मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसर्याचंकार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्याविरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधातआहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेमकरतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो. जे लोक गाईंच्याकत्तलिवरुन सोशल नेटवर्किंगवर रान उठवतात आणि त्यांच्या संवर्धनासाठी १ रुपयासुद्धा प्राणीसंस्थांना देतनाहीत मला अशा लोकांचा राग आहे. जे लोक दहशतवादासाठी विशिष्ट धर्माच्या लोकांना जबाबदार धरतातमी त्यांच्या विरुद्ध आहे. "बलात्कार आणि खून" या गुन्ह्याला मी दहशतवादी कृत्य समजतो........
मला पाऊस पडायला लागला कि मनसोक्त पावसात भिजावस वाटतं. मला पर्यटक नाही तर निसर्गप्रेमीव्हायला आवडतं. भारतात फिरायला आवडत नाही, पण मला महाराष्ट्रात फिरायला भन्नाट आवडतं.महाराष्ट्राची देवभूमी साताऱ्यावर मी मनापासून प्रेम करतो. वर्षातून 10 वेळा तरी कासच्या पठारावर बागडूनयेतो. मला सह्याद्रीला ऐन उन्हाळ्यात भेट द्यायला आवडतं, बहुधा त्याचवेळेस त्याला सच्च्या निसर्गप्रेमींचीगरज असते असा मला वाटतं. पावसाळ्यात, सर्वत्र हिरवाई पसरलेली असताना तर सर्वच भेट देतात त्यातकाय नवल? मला किल्ले, माळरानं, धरणाचे परिसर, जंगलं, अशा ठिकाणी फिरायला भारी आवडतं, आणिबरोबर माझा कुत्रा असेल तर मग काय विचारायलाच नको!!! गेल्या अनेक वर्षांपासून २ ट्रेक्स माझ्या मनातआहेत, लोणावळा ते भीमाशंकर आणि प्रचितगड. आता कधी संधी मिळते आणि कधी सर्व गोष्टी जुळूनयेतात ते पाहावे लागेल.
मी पूर्वी कुत्र्यांना फार म्हणजे फार घाबरायचो! आणि भूतांना सुधा!!!!! मग मी नामी शक्कल शोधून काढली.डिस्कवरीला पहिले होते, कुत्र्यांना ultrasonic समजते. मी कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला. एका दगडात २पक्षी मारले. कुत्र्यांची भीती निघून गेली, आणि भुताची भीती सुधा, कारण नेहमी प्लुटो माझ्या पायाजवळचबसलेला असतो. आता कुठलं भूत येईल मला त्रास द्यायला ते पहायचं होतं मला…त्यात भरीला भर माझाबोका.. एकदा घरातलं वातावरण जरा tense होतं. गेलो बाहेर आणि मांजराचं पिल्लू उचलून आणलं,तेव्हापासून माझ्याकडे कुत्रा आणि बोका सुखाने नांदत आहेत.
जुन्या मराठी चित्रपटांमधलि घरे पहिली कि माझं मन प्रफुल्लीत होतं, बैलजोडी, दारात आड, चुलीवरचास्वयंपाक, कोपऱ्यात ठेवलेलं जातं, ९ वारी साडी नेसलेल्या स्त्रिया, धोतर घातलेले पुरुष, पाहिलकी वाटतं,एखादा चमत्कार व्हावा आणि मी TV मध्ये प्रवेश करावा आणि ते वातावरण जवळून अनुभवावं, त्याचमुळेमाझ्याकडे अनेक मराठी चित्रपटांच्या CD/DVD आहेत. मला प्रभात फिल्म्स चे चित्रपट आवडतात. गेलीअनेक वर्षे मला कुंकू हा चित्रपट फार आवडायचा तसा अजूनही आवडतो पण अगदी अलीकडे पाहिलेलाशेजारी चित्रपट ०.१ % जास्त आवडतो. त्या काळात हिंदू - मुसलमान शेजार्यांवर चित्रपट काढणे म्हणजेखरोखर कौतुकास्पदच आहे. मला मोहित्यांची मंजुळा फार आवडतो, मंजुळा तर मनापासून आवडते. जेव्हामंजुळा आणि केदारजी पहिल्यांदा जत्रेत भेटतात तेव्हाचा सीन तर मी ५० वेळा परत परत बघतो. सुधीरफडके, श्रीनिवास खळे , ग. दि. मा., जगदीश खेबुडकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि लिहिलेली गीतेऐकताना मी अक्षरशः हरवून जातो… अलीकडच्या चित्रपटांमध्ये मला "धुमधडाका" भन्नाट आवडतो. माझंस्पष्ट मत आहे, लक्षाने रंगवलेला रात्रीचा भुताचा सीन, मेहमूदने "प्यार किये जा" मध्ये रंगवलेल्या सीनपेक्षा १००० पटीने प्रभावी आहे, आणि १००० पटीने मनोरंजक सुधा आहे!!! अजय-अतुल, सर्व नवीन चांगलेसंगीतकार, कल्पक मराठी दिग्दर्शक मला फार आवडतात…
माझं मराठी भाषेवर भन्नाट प्रेम आहे. माझी ठाम समजूत आहे कि, जगातल्या सर्व लोकांना मराठी समजतं.खूप साधी,सरळ, आणि सुंदर भाषा आहे, न कळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हैदराबाद मध्ये सुधाएखाद्या व्यक्तीशी बोलताना मी मराठीतूनच सुरुवात करतो, मग त्याला नाही समजले तर मग हिंदीतूनबोलायचं! मी माझ्या मुलीला मराठी शाळेतच घालणार आहे, बाकी कितीही संकटे आली तरी, कितीही त्यागकरावा लागला तरीही माझा निर्णय मी बदलणार नाही! आता मराठी अस्मितेबद्दल बोलायचं आणि यांच नावघ्यायचं नाही हे होऊ शकत नाही.
"राज ठाकरे" आपल्याला जाम आवडतात बरंका, अगदी सन २००० पासून….काही २-४ आक्षेपार्ह गोष्टीसोडल्या तर म न से तसा चांगला पक्ष आहे असं मी मानतो. [ सगळेच राजकीय पक्ष आपल्या कारकिर्दीतएखादी तरी घोडचूक करतातच विसरून जायचं आपण ;)]
"राज ठाकरे" आपल्याला जाम आवडतात बरंका, अगदी सन २००० पासून….काही २-४ आक्षेपार्ह गोष्टीसोडल्या तर म न से तसा चांगला पक्ष आहे असं मी मानतो. [ सगळेच राजकीय पक्ष आपल्या कारकिर्दीतएखादी तरी घोडचूक करतातच विसरून जायचं आपण ;)]
मी अभ्यासात जरा माठ होतो. त्यात आईवडील शिक्षक, तेव्हा खरडपट्टी सुधा भरपूर झाली, पण आज जोकाही आहे तो त्यांच्यामुळेच! मी माझ्या आईच्याच शाळेत शिकायला होतो. ६ वीला असताना आईचवर्गशिक्षिका होती बाप रे! लोकांना वाटायचं कि चंगळ आहे बुवा, पण मलाच माहिती होतं किती चंगळ होतीते!!! बाबा माझ्यासाठी नेहमी ठरलेले २ श्लोक म्हणायचे,"घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना." - अभ्यास सोडून दिवस दिवसभर क्रिकेट खेळायचोना म्हणून,आणि २रा माझा फेवरेट आहे,॥अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् । अधनस्य कुतो मित्रं अमित्रस्य कुतः सुखम् ॥
खरच मी भाग्यवानच आहे, मला असे आई वडील मिळाले…
खरच मी भाग्यवानच आहे, मला असे आई वडील मिळाले…
मला शाळेत असताना नाट्यवाचन आणि नाट्यसंगीत स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळाली. शास्त्रियगायनाच्या कलेला मी पुढे अजून विकसित नाही करू शकलो याची मला खंत वाटते. नाट्यवाचनाचे म्हणालतर तिथे सुधा मी थोडा कमीच पडलो. पण माझा एक DreamJob आहे, मला कार्टून फिल्म्स करता डबिंगकरायचय. कधी कधी घरामध्ये मराठी चित्रपटामध्ये जो पाटील असायचा त्याच्या आवाजात मला बोलायलाफार आवडतं, त्याशिवाय मी एक छाट-छूट नकलाकार सुधा आहे बरका! सगळ्यात चांगली नक्कल मी करतोती माझ्या बाबांची, अजून त्यांना हि गोष्ट माहित नाही त्याशिवाय संजीव कुमारचा घशातून आवाजकाढताना मी जे तोंड वेडं वाकडं करतो त्यासाठी बायकोचा मार सुधा खातो कॉलेजात असताना फिरोदियाकरंडकामध्ये मी भाग घेतला होता, पण जाऊदे नको त्या आठवणी! आमचं नाटक पडलं! फार वाईट वाटलंहोतं मला पुरुषोत्तमच्या स्टेजवर एकदाजरी संधी मिळाली असतीना तर…. जाऊदे उगाच अख्या जगासमोर स्वतःचेकौतुक नको!!!! आई रागवेल
No comments:
Post a Comment